ग्रुप ग्रामपंचायत विंचूरगवळी (सुलतानपूर), ता. जि. नाशिक
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

सरपंच
अनिता विजय रिकामे

उपसरपंच
उत्तमराव अमृता रिकामे

सदस्य
विजय दत्तात्रय रिकामे

सदस्य
दत्तात्रय दामोदर काळे

सदस्या
फुल्याबाई संजय कुवर

सदस्या
चंद्रकला भाऊराव गवळी

सदस्या
मनिषा प्रविण जाधव

सदस्या
लता मधुकर रिकामे

सदस्य
दत्तात्रय भिवसेन कुवर

ग्राम पंचायत अधिकारी
धुडकू विनायक पाटील

ग्रा.प.कर्मचारी
मच्छिंद्र निवृत्ती रिकामे

ग्रा.प.कर्मचारी
स्वाती अमोल रिकामे
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
गावाची सर्वसाधारण माहिती (परिच्छेद स्वरूपात)
विंचूरगवळी (सुलतानपूर) हे गाव नाशिक तालुका व नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. गावाची एकूण लोकसंख्या २३४७ असून त्यामध्ये १०५८ स्त्रिया व १२८९ पुरुषांचा समावेश आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ६२४.०९ हेक्टर असून त्यापैकी गावठाण क्षेत्र ४ हेक्टर आहे. बागायती क्षेत्र १३७.३०६ हेक्टर, पडीत जमीन ३० हेक्टर तर वनजमीन २० हेक्टर आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची गायरान व मैदान जमीन उपलब्ध आहे.
गावात ग्रुप ग्रामपंचायत विंचूरगवळी कार्यालय कार्यरत असून आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उपलब्ध आहे. शिक्षण सुविधांमध्ये २ अंगणवाड्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (इ. १ ली ते ८ वी) व नवजीवन पब्लिक स्कूल (इ. १ ली ते १० वी) यांचा समावेश आहे. नवजीवन पब्लिक स्कूलमध्ये २० वर्गखोल्या असून सुमारे २२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८ वर्गखोल्या व ५१ विद्यार्थी आहेत.
गावात पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन योजना तसेच विहिरींचा वापर केला जातो. आरओ वॉटर फिल्टरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सांडपाणी निचऱ्यासाठी गटारी व शोषखड्डे उपलब्ध असून घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
विंचूरगवळी गावाचे मुख्य उत्पन्न शेतीवर आधारित आहे. द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला, कांदे, गहू, मका व सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. टोमॅटो (९० हेक्टर), भाजीपाला (१५० हेक्टर), कांदे (५० हेक्टर), गहू (५० हेक्टर), मका (८५ हेक्टर) व सोयाबीन (८७ हेक्टर) इतके पीकक्षेत्र आहे. फळबागायतीत डाळिंब (२५ हेक्टर) व द्राक्ष (१३७ हेक्टर) लागवड केली जाते. सिंचनासाठी ३०० विहिरी, ८५ बोअरवेल, २ शेततळे, १ ओढा व ७ बंधारे उपलब्ध आहेत.
धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या गावात मारुती मंदिर व महादेव मंदिर असून उत्सव व परंपरा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. समाज मंदिर, स्मशानभूमी (विंचूरगवळी व सुलतानपूर) या मूलभूत सुविधा गावात उपलब्ध आहेत.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
फोटो गॅलरी











